पो. डा. प्रतिनिधी, गोंडपिपरी :- शासनाकडून निधी वितरित करण्यात दिरंगाई होत असल्याने ग्रामीण भागाचा विकास रखडला आहे. तोहोगाव च्या विकासासाठी मी कटिबद्ध असून टप्प्या-टप्या ने गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. सुभाष धोटे यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, गावातील मुख्य रस्त्याची अत्यंत दयना अवस्था असून मुख्य रस्त्याच्या काँक्रेटिकरणा साठी दीड कोटी रूपये प्रस्तावित करून गावच्या विकासाला हातभार लावण्याचे आश्वासन त्यांनी तोहोगाव ग्रामपंचायत येथे आयोजित बैठकीत दिले.
आमदार सुभाष धोटे तोहोगाव येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आले होते. त्यांनी तोहोगाव येथील ८०० मीटर बायबस रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणं साठी ३०५४ योजनेमधून ४५ लक्ष रुपये मंजूर केले होते. खनिज विकास निधी जिल्ह्याच्या निधी असून हे वितरित करण्यासाठी खनिज विकास समितीची सभा मागील १४ महिन्यापासून होत नसल्याने कोट्यवधी निधी पडून आहे.त्यामुळे ग्रामीण भागाचे अनेक विकास कामे होत नसल्याचे यावेळी ते उपस्तीत नागरिक व पदाधिकारींना सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या पोंभुर्णा उपविभागाकडून करण्यात आले होते. यावेळी तोहोगावच्या सरपंच अमावस्या ताळे, उपसरपंच शुभांगी मोरे, माजी उपसरपंच फिरोज पठाण, गोंडपीपरी चे शाखा अभियंता चुनारकर, शुभम ठेंगणे युवक काँग्रेस पदाधिकारी, नामदेव धोटे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष नीलकंठ रागीट, माजी उपसरपंच उज्वला ठेंगणे, ग्राम पंचायत सदस्य मदन खामनकर, नीलकंठ मोरे, सौ वनिता रागीट, सौ अनिता नागरकर, सौ पौर्णिमा भोयर, आनंद रामटेके, संतोष साळवे, सुनील वाघाडे, निसार शेख, सुमेध दुर्योधन, संतोष दहेलकर, महेंद्र दुर्गे यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थीत होते.