हटकर धनगर समाजाचे समाजसेवक अभिलाल दादा देवरे यांना यंदाचा राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार तसेच अण्णासाहेब खेमनार यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य युवा शक्ती अहिल्या सेनेच्या वतीने समाज कार्य करणाऱ्या समाज सेवकांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. युवा शक्ती अहिल्या सेनेचे अध्यक्ष मनोज कोळेकर यांनी समाजात प्रामाणिक काम करणारे समाज रत्नांची निवड केली आहे. त्यात राज्यस्तरीय समाज रत्न, अहिल्या कन्या रत्न, आदर्श मातापिता रत्न असे पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे मानकरी समाजसेवक अभिलाल दादा देवरे व अण्णासाहेब खेमनार यांनी गेल्या तीन वर्षापासून धुळे जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रात समाज व बहुजनांचे मोफत आरोग्यावर संपूर्ण ग्रामीण भागात हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो लोकांचे ईसीजी अँजिओग्राफी एन्जोप्लास्टी सेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून गव्हर्मेंटच्या रोलनुसार गावागावात जाऊन मोफत करून घेतले तसेच मुतखडा पीतखडा बायपास यासारखे शेकडो लोकांचे ऑपरेशन मोफत करून घेतले तसेच सरकारी हॉस्पिटलच्या माध्यमातून माता-भगिनींना डिलिव्हरी साठी वेळोवेळी सहकार्य केले, एनटीसी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 2017 ते 22 पर्यंत थकीत असलेली शिष्यवृत्ती समाज कल्याण कलेक्टर ऑफिस तसेच मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून प्राप्त करून घेतली, नोकर वर्गांसाठी विभागीय कार्यालयापासून तर मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून जुनी पेन्शनसाठी पाठिंबा दिला, सांजोरी फाटा ते उडाणे फाटा सर्विस रोड साठी वेळोवेळी पाठवा करून सर्विस रोड मंजूर करून घेतला, अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी लाईट रस्ता व बी बियाणे योग्य दरात मिळावे तसेच अति दृष्टीमध्ये आर्थिक मदत मिळावी यासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला, अशाप्रकारे अनेक क्षेत्रात समाज हिताचे लिखाण करून आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारा विरोधात वाचा फोडण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत. म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव झाला पाहिजे त्यामुळे समाज रत्न व समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रम धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या आवारात रविवार २८ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने या कार्यक्रमात पुरस्कार देऊन समाज सेवकांचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात समाजसेवेचे काम करणारे तसेच समाजसेवकाला मार्गदर्शन करणारे सर्व समाज बांधव ज्येष्ठ श्रेष्ठ माता-भगिनी तरुण मित्र उपस्थित राहणार तरी संपूर्ण समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे याची समाजाच्या वतीने आग्रहाची विनंती