चंद्रपूर – आय एम ए चंद्रपूर तर्फे जागतिक थॅलेसेमिया दिवस साजरा करण्यात आला. आय एम ए चंद्रपूर उपाध्यक्ष डॉ. पल्लवी इंगळे व सह सचिव डॉ. सोनाली कपूर यांच्या सहभागाने त्रीणिती बालरुग्ण्यालय येथे ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आई एम ए अध्यक्ष डॉ. कीर्ती साने, सचिव डॉ. कल्पना गुलवाडे, कोषाध्यक्ष डॉ. अपर्णा देवाईकर, उपाध्यक्ष डॉ. प्रीती चव्हाण, डॉ. सिद्दिका शिवजी ह्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. आई सी एम आर चंद्रपूर केंद्राचे प्रभारी डॉ. आनंद बदाडे यांनी आय एम ए च्या डॉ. आय ट्रस्ट यू( Doctor I Trust You) थीम अनुसरून चाचणी व ऍनिमिया प्रतिबंध या विषयावर जनजागृतीपर भाषण केले.
या कार्यक्रमाला उपस्थित पात्र मुलांसाठी आय एम ए चंद्रपूर मार्फत मोफत रक्त एच पी एल सी चाचणी व्यवस्था करण्यात आली होती. अशक्त मुलांना फॉलिक ऍसिडच्या गोळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले. त्रीणिती बालरुग्ण्यालय व शिवाजी बालरुग्ण्यालय येथील डॉक्टर्स व कर्मचारी यांचे या निम्मित आभार व्यक्त करण्यात आले.