३१ मे पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर जयंती निमित्त अनेक सामाजिक, राजकीय ,अनेक संघटना जयंती निमित्ताने अभिवादन करण्यासाठी जातील ..पण अनेक दिवसांपासून धुळ्यातील टॉवर बगीचा (सरदार पटेल उद्यान) इथे असणारे अहिल्याबाई होळकराचे स्मारक विना दिवा बत्ती चे नाही त्याला छत्र व रात्रीच्या अंधारात धूळखात पडले आहे पण कुणाच्या ही नजरेस जात नाही ..?
नाही प्रशासन ,नाही धुळे मनपा,नाही इतर सामजिक संघटना ,ना नेते ना पक्ष .फक्त राजकीय ,सामाजिक वर्चस्व साठी पोळी भाजण्यासाठी जयंती आली की फुलहार वगरे टाकून सोशेल मीडियावर ,पेपर मेडिया वर बातमी देण्यासाठी खोटी श्रद्धा असणारे अभिवादन करण्यासाठी जातील …?
एक प्रकारे त्या स्मारकाची विटंबना च होत आहे नाही देखभाल ना दुरुस्ती ना डागडुजी नाही लक्ष देणारे …?
व्हारे तुम्ही हंगामी महापुरुषांचा विचारांचे पाईक ….?😡
ज्यांनी भारतातील अनेक मंदिरे बांधली अनेक मंदीराचा जीर्णोद्धार केला त्याच्या स्मारकाची अशी अवस्था व्हावी खूप च निंदनीय बाब आहे..,
कुठलेही महापुरुष ऐका जाती धर्मा पुरते मर्यादित नसतात त्याचे कार्य अमर्यादित असतात….
अश्या प्रकारचा मेसेज सोशल मीडिया वर फिरत आहे.
जर या कडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असेल तर त्याचे लक्ष वेधून तातडीची कार्यवाही करणे क्रमप्राप्त आहे.