प्रमुख वक्ते दिल्ली येथील जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांची विशेष उपस्थिती
19 ऑगस्ट 2023 रोजी होणार भिवापूर वॉर्डात उदघाटन
पो. डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर , चंद्रपूर: दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या शिक्षण आणि लोकसेवेच्या समर्पणाला भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “दिवंगत खासदार बाळू धानोरकर अभ्यासिके “चे उद्घाटन शनिवार 19 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. चंद्रपूर येथील भिवापूर वॉर्डातील साई मंदिरात हा कार्यक्रम होणार असून, दिवंगत खासदार बाळू धानोरकर मित्र परिवाराने याचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधी पक्ष नेते ना. विजय वडेट्टीवार हे भूषवतील. वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन होईल. प्रमुख वक्त्यांमध्ये दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांची उपस्थिती राहणार असून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून राजुरा विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर जोरगेवार, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार श्री. देवराव भांडेकर, चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांची उपस्थिती राहणार आहे.
“दिवंगत खासदार बाळू धानोरकर अभ्यासिका” हि दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या समाजाच्या विकासासाठी बांधिलकीचा वारसा पुढे नेत स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान आणि प्रेरणा देणारे दीपस्तंभ बनणार आहे. उद्घाटन समारंभ हा शिक्षणाचा उत्सव साजरा करण्याचा, दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतीचा सन्मान करण्याचा आणि शैक्षणिक उत्कृष्टता आणि सामाजिक जबाबदारी या दोन्हींसाठी समर्पित असलेल्या नवीन पिढीला प्रेरणा देण्याचा एक प्रसंग आहे. त्यामुळे समाजातील दानशूर शिक्षणप्रेमीनी स्पर्धा परिक्षेची पुस्तके भेट द्यावी, असे आवाहन दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवाराने केले आहे.