पो. डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर चंद्रपूर : चंद्रपूरची इशिका प्रमोद सहारे हिने महाराष्ट्र राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. दि. 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान वसई मुंबई येथे सम्पन्न झालेल्या स्पर्धेत इशिका उपविजेती ठरली. आ. हितेंद्र ठाकूर यांच्या शुभहस्ते तिने पारितोषिक स्वीकारले.
दि. 23 जुलै रोजी झालेल्या चंद्रपूर जिल्हा स्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत इशिका सहारे हिने तृतीय क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली. राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांकावर मोहोर उमटवत इशिकाने चंद्रपूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंच केली आहे. स्थानिक माउंट कारमेल कॉन्व्हेंट मध्ये 4 थ्या वर्गात शिकणाऱ्या इशिकाने तिच्या यशाचे श्रेय आईवडील व शिक्षकांना दिले आहे. इशिकाचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.