पो. डा. वार्ताहर,चंद्रपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या चंद्रपूर येथील 100 फुट उंचीचा आणि घूग्घूस येथील 75 फुट उंचिचा तिरंगा झेंड्याचे उ्दया रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
चंद्रपूर येथील पोलिस मुख्यालय येथे 100 फुट आणि घूग्घूस येथील बस स्थानक येथे 75 फुट उंचीचा तिरंगा झेंड्यासाठी स्थानिक आमदार निधीतून आमदार किशोर जोरगेवार यांनी निधी उपलब्ध करुन दिला होता. या निधीतून सदर काम पूर्ण झाले आहे. उदया सकाळी आठ वाजता याचे लोकार्पण आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते केल्या जाणार आहे. तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.