पो.डा. वार्ताहर , वाशिम : पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे 10 ऑगस्ट रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. दुपारी 12 वाजता पालकमंत्री श्री. राठोड मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील नंगारा म्युझियम येथे पोहरादेवी व उमरी विकास कामाच्याबाबतीत यंत्रणांची आढावा सभा घेणार आहे. या सभेमध्ये पोहरादेवी- उमरी विकास आराखडयाअंतर्गत करावयाच्या विकास कामांकरीता आवश्यक सर्व जागेचे हस्तांतरण/संपादन, पोहरादेवी-उमरी विकास आराखडयाअंतर्गत कामे तातडीने पुर्ण करण्यासाठी संबंधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणा यांनी केलेले नियोजन, विकास आराखडयातील कामाचे नियोजन, म्युझियमच्या बाहेरील फसादच्या कामाची सद्यस्थिती, अंतर्गत गॅलरी डिझाईनसंदर्भात नियोजन व प्रत्यक्ष कामाच्या सुरुवातीसंदर्भात ते आढावा घेतील. सौरउर्जा प्रकल्पाची व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कामाची तसेच बायोलॉजीकल पार्क, पोहरादेवी येथील कामाच्या सद्यस्थितीबाबत, धानोरा ते पोहरादेवी व पंचाळा ते सिंगद रस्त्याच्या प्रस्तावासंदर्भात आढावा घेतील. या सभेला संबंधित यंत्रणांचे जिल्हयाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहतील.