पो. डा. वार्ताहर : लिंगभेदावरून केलेल्या व्यक्तव्यामुळे आता प्रसिध्द किर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे. इंदुरीकर महराजांची याचीका आता सुप्रीम कोर्टानेही फेटाळलेली आहे. यापुर्वी औरंगाबाद खंडपीठाने इंदुरीकरांविरोधात निकाल दिला होता. तर आता सुप्रीम कोर्टानेही इंदुरीकरांच्याविरोधात निकाल दिलेला आहे. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांवर संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात केस चालणार आहे. लिंगभेदावरून वक्तव्य केल्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला होता. त्यामुळे खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत इंदुरीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, खंडपीठाचे निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने इंदुरीकर यांना दणका दिला आहे. त्यामुळे आता इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
काय होत प्रकरण?
शिर्डी येथील ओझरमध्ये आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमात इंदुरीकर महाराज यांनी एक वक्तव्य केले होते. सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते, असं इंदुरीकर म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्या याच वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला होता. इंदुरीकर यांचे हे वक्तव्य म्हणजे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच PCPNDT सल्लागार समितीने इंदुरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान याच काळात इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून प्रथम वर्ग न्यायालयात 156 (3) याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सत्र न्यायालयाने हा आदेश रद्द केला होता.