पो.डा. वार्ताहर , परभणी : मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सूचना केंद्र व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने चारचाकी वाहन कंपनीतर्फे गुरुवारी (दि. १०) जॉब प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पात्र व गरजूंनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य विकास आडे यांनी केले आहे.
प्रामुख्याने जोडारी, टर्नर, संधाता, वीजतंत्री, टूल आणि डाय, पीपीओ, मशिनिस्ट, पेंटर, डिझेल, मोटार, ट्रॅक्टर मेकॅनिक व सीओई ॲटोमोबाईल व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्याची निवड करण्यात येणार आहे. चारचाकी वाहन कंपनीच्या वतीने आयटीआय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहाभागी व्हावे. अधिक माहितीसाठी संस्थेतील प्रशिक्षणार्थी सल्लागार एम. एम. बुगे, कार्यालयीन अधीक्षक ए. एन. गुंडेवाड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे प्रभारी अंशकालीन प्राचार्यांनी केले आहे.