पो.डा. वार्ताहर , रत्नागिरी : राज्यभरात महसूल सप्ताह १ ते ७ ऑगस्ट साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने जिल्हयातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ६ ऑगस्ट रोजी महसूल विभागातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रलंबित सेवा विषयक बाबी निकाली काढणे, त्याअनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी महसूल सप्ताहमध्ये “महसूल संवर्गातील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी /कर्मचारी संवाद” या कार्यक्रमाचे जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यामध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी संख्या ८७९ असून त्यापैकी सेवापुस्तकातील २१ बाबी अद्यावत केलेली सेवापुस्तके ७२० आहेत. तसेच ७१५ सेवापुस्तके ऑनलाईन करण्यात आली आहेत. सेवानिवृत्त कर्मचारी संख्या ३० असून त्यापैकी ९ सेवानिवृत्त प्रकरणे मंजूर झाली आहेत.
या कार्यक्रमांतर्गत मंडणगड तालुक्यामध्ये सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी तसेच तालुक्यातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचा संवाद कार्यक्रम तसेच सेवाविषयक प्रलंबित बाबी निकाली काढणे तसेच चेकलिस्ट प्रमाणे सेवापुस्तकात नोंदी घेणे याबाबतच्या मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
दापोली तालुक्यात सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेण्यात आल्या. याच कार्यक्रमांतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे रजारोखीकरणाचे देयक काढण्यात, ७ वा वेतन आयोगाचा ५ वा हप्ता देण्यात आला. तालुक्यात सर्व अधिकारी, कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी यांना ६ बंडल सिस्टीम व गाव नमुना नं. १ ते २१ यांचे प्रशिक्षण देण्यात आले. सेवापुस्तक नोंदी अद्ययावत करण्याबाबत शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
इतर तालुक्यांमध्येही महसूल सप्ताहांतर्गत महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधण्यात आला. तसेच प्रलंबित सेवा विषयक बाबी चे ही शिबीर देखील घेण्यात आले.