पो.डा. वार्ताहर , बुलडाणा, दि. 7 : मेहका येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आस्थापनेवर घड्याळी तासिकाप्रमाणे रिक्त पदे भरण्यात येणार आहे. पात्र इच्छुकांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
संस्थेत जोडारी व्यवसायासाठी 1 पद भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्रता ही आयटीआय आणि सीटीआय जोडारी व्यवसाय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर मेकॅनिकल इंजिनिअरींग आणि 2 वर्षे अनुभव, तसेच संपुर्ण संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. संधाता व्यवसायासाठी 2 पद भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्रता ही आयटीआय आणि सीटीआय संधाता व्यवसाय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर मेकॅनिकल इंजिनिअरींग आणि 2 वर्षे अनुभव, तसेच संपुर्ण संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. विजतंत्री व्यवसायासाठी 2 पद भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्रता ही आयटीआय आणि सीटीआय विजतंत्री व्यवसाय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग आणि 2 वर्षे अनुभव, तसेच संपुर्ण संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. सुतारकाम व्यवसायासाठी 1 पद भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्रता ही आयटीआय आणि सीटीआय सुतारकाम व्यवसाय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर मेकॅनिकल इंजिनिअरींग आणि 2 वर्षे अनुभव, तसेच संपुर्ण संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. इम्पलाबिलीटी स्कील व्यवसायासाठी 1 पद भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्रता ही एमबीए, बीबीए, कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि 2 वर्षे अनुभव, तसेच संपुर्ण संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन प्राचार्य व्ही. बी. शिरसाट यांनी केले आहे.