पो.डा.वार्ताहर , रत्नागिरी : अनुकंपा तत्त्वावरील २८ लाभार्थ्यांना महसूल विभागामध्ये नियुक्तीचे आदेश कोकण विभागीय आयुक्त डाॕ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले.
कोकण विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी जिल्ह्यात महसूल सप्ताहानिमित्त गेल्या चार दिवसात आयोजित केलेल्या कामांबाबत सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह सर्व महसूल अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डाॕ. कल्याणकर यांनी सर्व आढावा घेवून समाधान व्यक्त केले. महसूल दूत ही संकल्पना राबवून सर्व सामान्यांपर्यंत शासकीय योजना पोहचवा. सर्व सामान्यांची कामे पूर्ण होतील याकडे कटाक्षाने पहा. त्याचबरोबर योजनांची प्रचार प्रसिद्धीही करावी अशी सूचना केली.