पो.डा.वार्ताहर , चंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 8 वे राष्ट्रीय अधिवेशन 7 ऑगस्ट 2023 रोजी तिरुपती एस.व्ही. विद्यापीठात होणार आहे. या अधिवेशनात जातनिहाय जनगणना व्हावी, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात यावे, ओबीसी समाजावर लादण्यात आलेली क्रिमी लेयरची असंवैधानिक अट तात्काळ रद्द करण्यात यावी, क्रिमी लेयरची मर्यादा वाढवून रु. रद्द होईपर्यंत 20 लाख, मंडल आयोग, स्वामीनाथ आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करा, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देऊन सन्मानित करा, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण लागू करा, आदी मागण्यांवर सखोल चर्चा होणार आहे. सदर अधिवेशनाला देशातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहणार असून यात अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहे. होणाऱ्या अधिवेशनात चंद्रपुरातून सुद्धा हजारो ओबीसी बांधव जाणार आहे.
अशी महिती बबनराव तायवाडे, सचिन राजूरकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे चे संचालक दिनेश चोखारे,यांनी माहिती दिली.