विकासकामाची ठेकेदाराच्या माहितीसह निधीचे बोर्ड लावण्याची मागणी ….
१० ऑगस्टपर्यंत फलक न लागल्यास १५ ऑगस्टपर्यंत कार्यवाही करण्याचा इशारा…
श्री. राजन चौक, पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, धुळे: दोंडाईचा- शहरात मागील पाच-सहा वर्षात शासनाकडून विकासासाठी कोटी रुपयांचा निधी आला व विकास कामे झालीत. त्या सर्व विकास कामाची माहिती असलेली काम निहाय, कंत्राटदार, निधी बद्दल संबंधित माहितीसह फलक १० ऑगस्टपर्यंत गावात लावण्याची विनंती या निवेदनाद्वारे केलीय. आहे. अन्यथा १५ऑगस्ट पासून आंदोलनाची भुमिका घेण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी, धुळे व प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपालिका दोंडाईचा उभयतांना दिलेल्या निवेदनाचा आशय अगदीच सारखा आहे. की, गावात सन २०१६ ते २०२३ पर्यंत शासननिधीतुन करण्यात आलेली विकासकामे सविस्तर माहिती पालिकेत आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना माहित व्हावी, म्हणुन पालिकेच्या दर्शनी भागात फलकावर लावण्यात यावी, तसेच नगरात शासनाचा पैसा खर्च करून पूर्णत्वास आलेली विकासकामे एवढ्या सरळ-सोप्या भाषेत मिळावी हा मुक्या उद्देश या निवेदनामागे आहे. म्हणून १० ऑगस्ट २३ पर्यंत नगरात झालेल्या विकासकामांच्या ठीकठिकाणी बोर्ड लावण्यात यावे, अन्यथा १५ ऑगस्ट २३ पासून त्यांना आंदोलनात्मक भुमिका घ्यावी लागेल,अस इशारा निवेदनात दिला आहे.