MPSC ने २८९ दंत शल्यचिकित्सक (गट-ब) पदांसाठी घेतलेल्या परिक्षेचा अंतिम निकाल लागण्यासाठी पात्रता निकष स्पष्ट होणे आवश्यक आहे. याबाबत #MPSC ने सरकारकडे पत्रव्यवहार करुनही कोणताही अभिप्राय अद्याप सरकारकडून मिळालेला नाही. त्यामुळे हा निकाल प्रलंबित असून #MPSC कडे लवकरात लवकर पात्रता निकष पाठवण्याची विनंती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांना केली. याबाबत तातडीने सूचना देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.