पो. डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर चंद्रपूर : उर्जानगर वसाहतीमधील सर्वांचे परिचीत असलेले सामाजिक कार्यकर्ते श्री. शब्बीर शेख यांना सामाजिक कार्याबददल राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहु गौरव पुरस्कार २०२३ चा प्रदान करण्यात आला.
श्री. शब्बीर शेख हे चंद्रपुर महाऔष्णीक विजनिर्मीती केंद्र येथे तंत्रज्ञ – ३ या पदावर कार्यरत आहे. कोल्हापुर येथील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृह येथे अविष्कार सोशल अॅन्ड एज्युकेशन फौंडेशन यांनी आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात सन्मान पत्र, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, फेटा देउन पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी अविष्कार सोशल अॅन्ड एज्युकेशन फौंडेशनचे अध्यक्ष श्री. संजय पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यांनी श्री. शब्बीर शेख यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य आहे, त्यांनी आपल्याला सामाजीक कार्यात स्वःताला वाटुन घेतले आहे, अनाथ, अपंग, गोरगरीब लोकांच्या सेवेकरीता श्री. शब्बीर शेख सदैव तयार असतात. आपली नोकरी सांभाळुन त्यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे त्यांच्या कार्याचा आढावा घेवुन त्यांना हा पुरस्कार देन्यात आला आहे.
श्री. शब्बीर शेख यांना राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहु गौरव पुरस्काराने सन्मानीत केल्याबददल कामगार नेते नंदकीशोर धडांगे, जिल्हा परिषदेचे माझी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगडे, गुणवंत कामगार वम्हानंद शेंडे, पांडुरंग बोबडे, पंकज काळे, प्रविण येरगुडे, प्रकाश कोहपरे, संदिप केदार, सुनिल वाढई, पंकज कुरेकार, कविता नवघरे, रेहीणी पिदुरकर, किशोर कौरासे, उमेश आवारी तसेच उर्जानगर मधील सर्व संघटनेचे पदाधिकारी व सभासद आणि उर्जानगर वासीयांनी शब्बीर शेख यांना अभिनंदन केले.