पो. डा. वार्ताहर , बुलडाणा : मेहकर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत घड्याळी तासिका तत्वावर पदभरती करण्यात येणार आहे. ही रिक्त पदे शैक्षणिक वर्ष सन 2023-24मध्ये नियमित शिल्पनिदेशक रुजू होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार आहे.
संस्थेतील जोडारी या व्यवसायासाठी शिल्पनिदेशक, 1 पद भरण्यात येणार आहे. यासाठी पात्रता ही अनुभव प्रमाणपत्र, आयटीआय डिप्लोमा, डिग्री, सीटीआय, शैक्षणिक कागदपत्रे, तसेच संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. संधाता व्यवसायासाठी शिल्पनिदेशक 2 पदे, विजतंत्री साठी शिल्पनिदेशक 2 पदे, सुतार कामासाठी शिल्पनिदेशक 1 पदे, इम्पलाबिलीटी स्कीलसाठी शिल्पनिदेशक 1 पदे भरण्यात येणार आहे.
उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सह दि. 31 जुलै 2023पर्यंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, डोणगाव रोड, मेहकर येथे अर्ज पाठवावेत, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही. बी. शिरसाट यांनी केले आहे.