पो. डा. वार्ताहर , लातूर : राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह प्रवेश योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार औरंगाबाद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, बीड व लातूर या चार जिल्ह्यातील 14 वसतिगृहांमध्ये अनुसूचित जमातीच्या पात्र विद्यार्थी- विद्यार्थिनींना तालुकास्तरावर इयत्ता आठवीपासून पुढील शिक्षणासाठी, तसेच जिल्हास्तरावर इयत्ता अकरावीपासून नंतरच्या शिक्षणासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील प्रवेश प्रक्रिया दिनांक 1 जून 2023 पासून सुरु झालेली असून वसतिगृह क्षमता 2 हजार 775 च्या अनुषंगाने रिक्त असलेल्या 1 हजार 352 जागांसाठी ऑनलाईन प्रणालीवर प्राप्त अर्जांमधून पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानुसार सन 2023-2024 साठी पालकांचे घोषणापत्र व विद्यार्थ्याचे घोषणापत्र नमुना आणि विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करताना
https://drive.google.com/file/d/1uWMTN0ARcXZZI5qqUaokCL3URmfqU6e/view?usp=sharing या लिकंमध्ये देण्यात आलेल्या सूचनांची खबरदारी घ्यावी वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी http://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरावा. तसेच अर्ज भरल्यानंतर संबंधित गृहप्रमुख किंवा गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन औरंगाबाद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.