पो. डा. वार्ताहर : पालघर दि. 18 : कोंकण विभागीय अधिस्विकृती समितीवर अधिस्विकृतीधारक पत्रकार हर्षद पाटील यांची राज्य शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली. त्यांचे स्वागत जिल्हा माहिती कार्यालय येथे जिल्हा माहिती अधिकारी अर्चना शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांना पुढील वाटचालीसाठी शंभरकर यांनी शुभेच्छा दिल्या. श्री हर्षद पाटील हे झी 24 तासचे जिल्हा प्रतिनिधी असून गेले कित्येक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.
यावेळी साप्ताहिक पालघर मित्रचे संपादक पंकज राऊत, दै.लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी निरज राऊत, दै. सामनाचे जिल्हा प्रतिनिधी सचिन जगताप, दै. पुढारीचे जिल्हा प्रतिनिधी मंगेश तावडे, दै. भास्करचे जिल्हा प्रतिनिधी संजय सिंह, दै. लोकसत्ताचे निखिल मेस्त्री, आकाशवाणीच्या प्रतिनीधी निता चौरे उपस्थित होत्या.