घरपोच दुय्यम शिधापत्रिका व नाव कमी जास्त करणे अभियान
पो. डा. वार्ताहर , वाशिम : रिसोड तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या वतीने तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी ९ जून २०२३ पासुन घरपोच दुय्यम शिधापत्रिका अभियान राबविणे सुरु आहे. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याला जोड म्हणुन ग्रामीण शिधापत्रिकाधारकांचा वेळ व पैसा वाचवा या दृष्टीकोनातुन नाव कमी करणे व समाविष्ठ करणे आणि नावे ऑनलाईन करण्याकरीता शिधापत्रिकाधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित गावचे रास्तभाव दुकानदार यांच्यामार्फत विहीत नमुन्यात अर्ज भरुन व आवश्यक कागदपत्रे जमा करावे. जेणेकरुन घरपोच दुय्यम शिधापत्रिका व शिधापत्रिकेतुन नाव वगळणे किंवा समावेशीत करुन गावातच शिधापत्रिका मिळणार आहे. तरी ” शासन आपल्या दारी ” या नाविन्यपुर्ण योजनेचा जास्तीत जास्तीत जास्त शिधापत्रिकाधारकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन तहसिलदार रिसोड व पुरवठा विभागाने केले आहे.