पो. डा. वार्ताहर : बुलढाणा तालुक्यातील साखळी बुद्रुक येथे धर्मवीर युथ फाऊंडेशनची आढावा बैठक बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र धर्मवीर युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली,
या बैठकीमध्ये पृथ्वीराज गायकवाड यांनी गावातील तरुणांना विविध विषयावर मार्गदर्शन केले तसेच गावातील तरुणांनी आपल्या असंख्य समस्या यावेळी पृथ्वीराज गायकवाड यांना सांगितल्या…!तसेच
येणाऱ्या २३ जुलै रोजीच्या धर्मवीर युथ फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्ताने उपस्थित सर्व तरुणांना जाहीर आमंत्रण पृथ्वीराज गायकवाड यांनी दिले तसेच देव देश धर्म कार्यासाठी सर्वांनी वाहून घ्यावे आणि धर्मवीर युथ फाउंडेशन मध्ये जास्तीत-जास्त संख्येने सहभागी व्हावे असे देखील सांगितले…!
यावेळी सोबत डॉ.कैलास उगले, विजय डोईफोडे, केतन मादनकर, ज्ञानेश्वर खांडवे, शुभम दांडगे, सोपान वाघमारे, अमोल आल्हाट, धीरज लहासे, शुभम वाघमारे, पवन चौधरी, ज्ञानेश्वर जाधव, कैलास पाचपोर, सचिन लवंगे, मोहित नाटेकर, आकाश सावळे,ऋषिकेश जाधव, नितीन उगले, प्रज्वल धुळधर, सतीश काकडे, दिगंबर घोरपडे, विष्णू डांगे, अनिल पोपळघट, संतोष जुमडे, बाबुराव चौधरी, प्रकाश सावळे,यांच्यासह ग्राम. साखळी बु येथील असंख्य युवक तसेच धर्मवीर युथ फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते…!