पो. डा. ग्रामीण प्रतिनिधी, चंद्रपूर : महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर ता.कोरपना जि. चंद्रपूर येथील माजी विद्यार्थिनी कु. पूर्वीता वासुदेव मून रा.गडचांदूर हि MPSC ने काल घोषित केलेल्या टॅक्स असिस्टंट 2021 या परीक्षेच्या निकालात एससी प्रवर्गात महिलांमधून राज्यात सातवी रँक घेऊन उत्तीर्ण झाली. तिने मिळविलेल्या यशाबद्दल गडचांदुर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदुरचे सचिव श्री धनंजय गोरे ,उपप्राचार्य महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय प्रफुल्ल माहुरे , प्रा प्रदीप परसुटकर, प्रा सचिन भैसारे यांनी गृहभेट घेउन हार्दिक अभिनंदन केले.