सुपर स्पेशालीटीतील शिबिरात 55 जणांचे रक्तदान
पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, अमरावती, : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे 27 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबीरात 55 जणांनी रक्तदान केले.
रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल नरोटे आणि विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांनी शिबिराचे आयोजन केले. शिबिरामध्ये रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी आणि खासगी वैद्यकीय संस्थेतील विद्यार्थी, विदर्भ आयुर्वेद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.
शिबिरासाठी महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना विभाग प्रमुख डॉ. श्याम गावंडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव ढोपरे, डॉ. विक्रांत कुळमेथे, परिसेविका अलका जवंजाळ, वैद्यकीय समुपदेशक दिनेश हिवराळे, मुकादम श्रीकांत ढेंगे, विक्रांत येते यांनी सहकार्य केले. जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी अंतर्गत डॉ. अविनाश उकंडे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. राहुल खराटे, रक्त संक्रमण अधिकारी मिलिंद तायडे, जनसंपर्क अधिकारी संगिता गायधने, मंगेश उमप, प्रविण कळसकर यांनी रक्त संकलनाचे कार्य पाडले.