पो. डा. वार्ताहर , वाशिम : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय, वाशिम अंतर्गत आज 13 जुलै 2023 रोजी मंगरुळपीर तालुक्यातील फाळेगाव येथील श्री. जयकिसान हायस्कूल येथे शालेय विद्यार्थ्याना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, कोटपा कायदा 2003, मुख कर्करोग व त्याची प्राथमिक लक्षणे तसेच त्यावरील प्राथमिक उपचार, तंबाखूमुक्त शाळेचे निकष याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तंबाखूमुक्त शाळेचे फलक यावेळी देण्यात आले. मुख्याध्यापक श्री.मांजरे, जिल्हा सल्लागार डॉ.आदित्य पांढारकर, मानसशास्त्रज्ञ राम सरकटे, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे व शिक्षकांची यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.