पो. डा. वार्ताहर : बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील प्रियदर्शनी कॉलेज, बबनरावजी देशपांडे कॉलेज, कन्या हायस्कूल मोताळा येथे धर्मवीर युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांनी महाविद्यालयीन मुलींबरोबर संवाद साधून कोणत्याही प्रकारच्या तक्रारी किंवा समस्या असल्यास त्या आपल्या तक्रारी सविस्तर लिहून महाविद्यालय परिसरात मध्ये बसविण्यात आलेल्या रक्षाबंधन पेटीमध्ये टाकाव्या त्यानंतर त्या तक्रारीवर धर्मवीर युथ फाऊंडेशन तातडीने निर्णय घेईल असे देखील यावेळी महाविद्यालयीन तरुणींसोबत संवाद साधताना पृथ्वीराज गायकवाड यांनी सांगितले, रक्षाबंधन पेटी बसविण्याच्यावेळी सोबत मोताळा येथील सचिन हिरोळे, योगेश विधाते, शिवा घडेकर,सुरज देशमुख, सुमित सोनुने, रोशन हागे, तेजस कळसकर, ज्ञानेश्वर सपकाळ, गणेश खंडे, तसेच बुलढाणा येथील सतीश काकडे, कार्तिक पवार यांच्यासह मोताळा तसेच बुलढाणा येथील धर्मवीर युथ फाऊंडेशनच्या असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते….!