पो. डा. वार्ताहर , जळगाव : जळगाव जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार मिलिंद दुसाने व माहिती अधिकारी पदाचा कार्यभार सुरेश पाटील यांनी आज स्विकारला .
जळगाव जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची नाशिक येथे बदली झाल्याने त्यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांच्याकडे देण्यात आला आहे.
माहिती अधिकारी श्रीमती शैलजा देशमुख यांची डहाणू येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर उप माहिती कार्यालय, शिर्डी, जि.अहमदनगर येथील माहिती अधिकारी सुरेश पाटील यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला आहे.