पो. डा. वार्ताहर , वाशिम : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,(आयटीआय) वाशिम येथे प्रवेश सत्र ऑगस्ट-2023 करीता प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया 12 जुन 2023 पासून सुरू आहे. इयत्ता 10 वी उत्तीर्ण इच्छुक विदयार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वाशिम येथे एकुण 12 व्यवसाय व 24 तुकडया उपलब्ध आहेत. यामध्ये 4 व्यवसाय 2 वर्ष मुदतीचे विजतंत्री,जोडारी, आर.ए.सी व यांत्रीकी मोटारगाडी आणि 8 व्यवसाय 1 वर्ष मुदतीचे वेल्डर, बेसीक कॉस्मेटोलॉजी फुड प्रोडयशन, फॅशन टेक्नॉलॉजी,कारपेंटर,मेकॅनिक डिझेल,अॅटो इलेक्ट्रीशन व इलेक्ट्रानिक्स व कोपा आहे. यामध्ये एकूण 428 उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रत्येक व्यवसायात स्त्री उमेदवारांना 30 टक्के प्रवेश राखीव आहे. बेसीक कॉस्मेटोलॉजी हे व्यवसाय स्त्री उमेदवारांकरीता राखीव आहे. सत्र 2023 पासून विद्यावेतनचा दर 40 रुपये प्रति महीन्यावरून 500 रूपये प्रति महिना करण्यात येणार आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन व्यावसायीक शिक्षण संस्थेतुन पुर्ण करून त्वरीत रोजगार स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत म्हणजेच आय.टी.आयमध्ये प्रवेश घ्यावा. असे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रकाश जयस्वाल यांनी केले आहे.