काम जलदगतीने पूर्ण करण्याची केली सूचना
पो. डा. वार्ताहर ,चंद्रपूर: चंद्रपूर येथील मुख्य बस स्थानकाचे निर्माण कार्य सुरू आहे.किमान 5 वर्षाचा कालावधी लोटूनही हे काम अद्याप पूर्ण झाले नाही.नवनिर्माणाधिन असलेले हे बस स्थानक लवकर अस्तित्वात यावे,कामाची गती वाढावी म्हणून महानगर भारतीय जनता पार्टी तर्फे मंगळवारी बस स्थानकाची पाहणी करण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष(श)डॉ मंगेश गुलवाडे,महासचिव सुभाष कासंगोट्टूवार,रवींद्र गुरनुले,भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर,भाजपा नेते विठ्ठल डुकरे,रवी लोणकर,संदीप आगलावे,दिनकर सोमलकर,धनराज कोवे,अजय सरकार व समाजसेवक मयूर भोकरे यांची उपस्थिती होती.या प्रसंगी शिष्टमंडळाने
विभाग नियंत्रक सुतावणे व मॅडम यांना सूचना दिल्या. यात डॉ. मंगेश गुलवाडे (महानगर अध्यक्ष )यांनि शिष्ट मंडळाचे नेतृत्व केले सोबत महामंत्री सुभाष कसंगोट्टूवार, रवींद्र गुरनुले, भाजयुमो अद्यक्ष विशाल निंबाळकर, अनुसूचित जाती अध्यक्ष धनराज कोवे, विठ्ठल डुकरे मंडळ अध्यक्ष, रवी लोणकर मंडळ अध्यक्ष, संदीप आगलावे मंडळ अध्यक्ष, दिनकर सोमलकर मंडळ अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते मयूर भाऊ भोकरे हे हजर होते.यावेळी विभागीय नियंत्रक स्मिता सुतवणे व विभागीय अभियंता राहुल मोडक यांनी शिष्टमंडळाला सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.
डॉ.गुलवाडे यांनी कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार भाजपा महानगरचे शिष्टमंडळ आले असल्याची माहिती देत उर्वरित कार्य यथाशीघ्र पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय अभियंता मोडक व नियंत्रक सुतवने यांना केल्या.यावर मोडक यांनी पुढील 3 महिन्यात हे बांधकाम पूर्ण होणार असल्याचे सांगितले.किमान 20 कोटींचा हा प्रकल्प प्रवाश्यांना ताडोबा सहलीसाठी प्रेरणादायी असेल,अशी माहिती स्मिता सुतवने यांनी दिली.