पो. डा. वार्ताहर , वाशिम : जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आज ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती अभियान व समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी विधी स्वयंसेवक शाहीर उत्तम इंगोले यांनी मनोरंजनात्मक शैलीतुन लोक जनजागृतीपर गाणी सादर करुन उपस्थितांचे प्रबोधन केले.तसेच लोकसंख्या वाढीचे वर्तमान व भविष्यातील दुष्परिणामाबाबत लोकांना मार्गदर्शन केले.यावेळी त्यांना सुनिता रनवीर,सुनिल लबडे व सचिन भालेराव यांनी सहकार्य केले.जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक व इतर नागरीकांना विधी स्वयंसेवक सुशिल भिमजियाणी, मोतिराम खडसे, मनिषा दाभाडे, उषा वानखेडे व शितल बनसोड यांनी कायदेविषयक जनजागृतीपर हस्तपत्रके वाटुन कायद्याबाबत माहिती दिली.