पो. डा. वार्ताहर , चंद्रपूर : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्राचे “आमदार राजे धर्मरावबाबा आत्राम” यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील त्यांच्या प्रथम आगमनानिमित्त “मा.सुनिल भाऊ दहेगांवकर” यांच्या नेतृत्वात सर्किट हाऊस येथे ढोल ताशांच्या गजरात, फटाके फोडून, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.