माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले कौतुक.
पो. डा. वार्ताहर, राजुरा (ता. प्र) :– राजुरा येथील भारत चौक येथे वास्तव्यास असलेल्या रोशन प्रकाश हावडा यांनी नुकतीच चार्टर्ड अकाऊंटंट ची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली. त्याच्या या यशाबद्दल माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी त्यांचे घरी प्रत्यक्ष भेट घेऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्याचे कौतुक केले. अतिशय कठोर परिश्रमातून रोशन ने मिळवलेले यश हे अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी तालुका काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवार, सारंग गिरसाळवे, अब्दुल वकील, जयप्रकाश पांडे, सुरेश लेखराजानी, प्रकाश हावडा, भावना हावडा यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.