पो. डा. वार्ताहर ,गडचिरोली : मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे, उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि Ajit Pawar यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृह आणि निवासी शाळांचे लोकार्पण करण्यात आले. गडचिरोली येथे मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांचे शासकीय वसतीगृह, चामोर्शी येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शासकीय वसतीगृह आणि गडचिरोलीती मागासवर्गीय मुलांच्या निवासी शाळेचे लोकार्पण करण्यात आले.
आरोग्य विभागाच्या पेडियाट्रिक मॉड्युलर आयसीयूचे आणि पोलीस विभागाच्या मुरूमगाव येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाची माहिती देणाऱ्या कॉफी टेबल बुकचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.