पो. डा. वार्ताहर , वाशिम : सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांना दर ३ महिन्यांनी ऑनलाईन ई-आर-१ सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) कायदा १९५९ व नियमावली १९६० मधील कलम ५ (१) व ५ (२) नुसार सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे. यासाठी यापुर्वी प्राप्त झालेला युझर आयडी व पासवर्ड टाकुन १ एप्रिल २०23 ते 30 जून २०23 या तिमाही कालावधीचे (आस्थापनाच्या हजेरी पत्रकाच्या कर्मचारी संख्येनुसार) ई-आर-१ माहे, जुलै २०23 अखेरपर्यंत ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
ई-आर-१ भरण्यासाठी http://www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन एम्पलॉयमेंट या टॅबमध्ये एम्पलॉयर लॉगीनमधून आपल्या आस्थापनेची माहिती प्रोफाईल तात्काळ अद्यावत करावी. ३१ मार्च, ३० जुन, ३० सप्टेंबर व ३१ डिसेंबर प्रत्येक तिमाही संपताच ३० दिवसाच्या आत तिमाही विवरणपत्र ईआर-१ ऑनलाईन सादर करावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल शेळके यांनी केले आहे. काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या ०७२५२-२३१४९४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.