पो. डा. वार्ताहर : गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार राहुल शेवाळे, आमदार डॉ. बालाजी किणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.