मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते पाटण तालुक्यातील मरळी, दौलतनगर येथे १२८ गावांतील १२२ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे ई – भूमिपूजन करण्यात आले.
राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की –
✅ सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला न्याय देणारे सरकार आहे.
✅ गेल्या एक वर्षाच्या काळात अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले.
✅ नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान.
✅ महिलांना एस. टी प्रवासात ५० टक्के सवलत,
✅ केंद्राच्या किसन सन्मान योजनेत राज्य शासनाच्या आणखी ६ हजार रुपयांची भर घालून आता १२ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
✅ शासनाने अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत.
✅ ३२ नव्या सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
✅ महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवून आता ही योजना राज्यातील सर्व नागरिकांना लागू केली आहे. त्यासाठी पिवळे, केशरी शिधा पत्रिका अशी कोणतीही अट नाही. तसेच या योजनेत आता ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय सहाय्य मिळणार आहे.
✅ सिंचनाच्या सुविधा वाढवण्यात येत आहे.
✅ जलयुक्त शिवार, गाळ मुक्त धारण गाळ युक्त शिवार अशा योजना पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.
✅ ‘शासन आपल्या दारी’ च्या माध्यमातून आज प्रशासन लोकांच्या घरी पोहचले आहे, ही एक क्रांती आहे.
✅ बचत गटांना त्यांचे उत्पादन विक्रीसाठी मदत करण्यात येईल.
आजची वर्षपूर्ती आपण विकास कामांच्या माध्यमातून साजरी करत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.