पो. डा. वार्ताहर वाशिम : राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण ह्या 3 व 4 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्ह्यातील महिलाविषयक प्रकरणांचा आढावा आयोजित सभेत घेतील. या सभेला महिलांच्या प्रश्नांशी संबंधित असलेले विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. यामध्ये डीव्ही केसेस, तक्रार निवारण समिती, बेपत्ता असलेली बालके, बालविवाह, भरोसा सेल, निर्भया पथक, सखी वन स्टॉप सेंटर, महिलाविषयक योजनांची माहिती, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, महिला ऊसतोड कामगारांचे प्रश्न, पोलीस स्टेशन आवारातील समुपदेशन केंद्र, तृतीयपंथीयांच्या योजना, हिरकणी कक्ष, बस स्टँडवर महिला वाहकांसाठी चेंजिंग रूम, बस स्टॅन्डवरील महिलांची सुरक्षितता व शौचालय आणि महिलांचे बसमधील आरक्षण या विषयांचा समावेश आहे. 4 जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे भेट देऊन महिलांच्या पोलीस विभागाशी संबंधित विविध विषयांचा आढाव घेतील. तसेच ॲड. श्रीमती चव्हाण ह्या महिलांच्या प्रश्नांशी संबंधित काही ठिकाणी भेट देणार आहेत.