पो. डा. वार्ताहर : विविध सुविधा पुरवणाऱ्या अर्बन कंपनीच्या व्यवस्थापनाने कुठलीही पूर्वसुचना न देता शेकडो महिलांना कामावरून कमी केले.
त्यामुळे त्या महिलानी शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला न्याय मिळेल म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे दादर येथील #श्रमीकगड कार्यालयवर धाव घेतली.व आपल्या समस्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेने समोर मांडल्या.
यावेळी सर्व महिला सदस्यांच्या समस्या व प्रश्न ऐकून घेतल्या व त्यानंतर तुम्हाला तुमचा योग्य मोबदला व न्याय मिळेल असा ठाम विश्वास दिला.
आज अर्बन कंपनीच्या दिल्ली वरून आलेल्या व्यवस्थापनासोबत भेट घेऊन आपल्या नेहमीच्या शैलीने समज दिली. व ती समज व्यवस्थापनाला वेळीच समजली त्यानंतर त्यानी सर्व महिलांना २४ तासात त्यांचा आयडी अनब्लॉक करून कामावर घेऊ अशी सकारात्मक भूमिका घेतली.
यावेळी सर्व महिला सभासदांचा अचानक गेलेला जॉब व झालेली आर्थिक फसवणूक पासून मिळालेली सुटके नंतर सगळ्या महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री.राजसाहेब ठाकरे व मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांचे आभार मानले.