पो. डा. वार्ताहर : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व सहाय्य विभागाद्वारे विशेष सहाय्य योजने अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील 50 वर्षे व त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यांकडून दरवर्षी आर्थिक वर्षे संपल्यावर उत्पनाचे दाखला घेण्याची तरतूद रद्द करून सदर दाखल पाच वर्षातून एकदाच घेण्याची तरतूद शासन निर्णयाद्वारे घेण्यात आले त्याबद्दल मा. मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस तसेच महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे ब्रिजभूषण पाझारे संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तसेच समिती सदस्य निलेश पाझारे, अर्चना मानलवार, ऍड. सारिका संदूरकर, दिवाकर पुदटवार, अजय सरकार, श्रीराम पान्हेकार, प्रवीण उरकुडे, सचिन कोतपल्लीवर, अशोक संगीडवार संजय गांधी निराधार समितीचे पदाधिकारी या नात्याने शतशः अभिनंदन !