पो. डा. वार्ताहर वाशिम : कृषी विभागाच्या वतीने 25 जून ते 1जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.सप्ताहाचे औचित्य साधून आज कारंजा तालुक्यातील विळेगाव येथे ” कृषी क्षेत्राची भावी दिशा ” या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे,अमरावतीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, अमरावती उपविभागीय कृषी अधिकारी पंकज चिडे,वाशिम कृषी उपसंचालक शांतीराम धनवडे व वाशिमचे तंत्र अधिकारी (विस्तार) दिलीप कंकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना जसे की, ज्यामुळे सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविण्यास मदत होईल याबाबत श्री.कंकाळ यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष शेतावर सोयाबीन व कपाशी टोकन पद्धतीने वरंब्यावर लागवड करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
कृषी क्षेत्राची भावी दिशा याविषयावर श्री.मुळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी संतोष चौधरी यांनी केले.उपस्थितांचे आभार गुणवंत ढोकणे यांनी मानले.
कार्यक्रमाला विळेगाव सरपंच श्री घुले व बहुसंख्य शेतकरी तथा एकता शेतकरी गटाचे सर्व सदस्य तसेच शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.उपस्थित विधवा महिला शेतकऱ्यांना गटामार्फत सोयाबीन बियाण्याची एक बॅग मोफत वाटप करण्यात आली.यशस्वीतेसाठी राहुल रविराव,मंडळ कृषी अधिकारी रवींद्र जटाळे,कृषी पर्यवेक्षक जगदीश उपाध्ये व कृषी सहाय्यक अनिल भगत व शेतकऱ्यांनी सहकार्य केले.