पो. डा. वार्ताहर : आज दिनांक २९ जून २०२३ रोजी देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील वाघजाळ फाटा येथील रुख्मिणी पांडुरंग संस्थान येथे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या सुविद्य पत्नी बुलढाणा नगरपालिकेच्या मा.नगराध्यक्ष सौ पुजाताई संजय गायकवाड तसेच युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते विठुरायाची मनोभावे पूजा करण्यात आली तसेच मतदार संघातील तसेच महाराष्ट्रातील बळीराजा सुखी व्हावा यासाठी, विठुरायाला पाण्यासाठी साकडे घालवण्यात आले,यावेळी सोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख रामदास चौथनकर, बाळासाहेब नारखेडे, नामदेवराव पाटील, सुरेश खर्चे, तेजराव शिंबरे, बंडू पाटील, एकनाथ राठोड, राजू पाटील, गजानन चव्हाण, गणेश पाटील, प्रवीण निमकर्डे,सचिन हिरोळे,विश्वंभर लांजुळकर, मारुती कोल्हे, तुळशीराम सपकाळ, दिनेश भिडे, गणेश जवर, सचिन शिंबरे, स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर वाघ, रणजीत राजपूत,दीपक तुपकर, ज्ञानेश्वर खांडवे, सचिन कोठाळे, यांच्यासह समस्त शिवसेना युवा सेना पदाधिकारी तसेच भाविक भक्त उपस्थित होते….!