पो. डा. वार्ताहर : चिमूर येथील कवी प्रकाश कोडापे यांच्या ‘संघर्ष’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवार, दि.२४ जून २०२३ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह,चिमूर येथे संपन्न झाले. प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत ऍड.भूपेश पाटील उदघाटक म्हणून उपस्थित होते.अध्यक्षस्थान भद्रावती येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुधीर मोते यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. देवमन कामडी,डॉ.आनंद किन्नाके, डॉ. प्रकाश वट्टी, कल्पना गेडाम, सुंदर गावडे, राजू डहाके,कवी प्रवीण आडेकर,तुळशीदास महल्ले आदी उपस्थित होते.
या प्रकाशन सोहळ्यासोबतच कविसंमेलन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.कविसंमेलन भद्रावती येथील प्रसिद्ध कवी प्रवीण आडेकर यांचे अध्यक्षतेत संपन्न झाले.कविसंमेलनाचे बहारदार आणि प्रभावी सूत्रसंचालन चंद्रपूर येथील युवा कवी स्वप्नील मेश्राम यांनी केले. कविसंमेलनात अनेक कवींनी आपल्या वैविध्यपूर्ण कविता सादर केल्या.
कार्यक्रमाला कवी,लेखक,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,विद्यार्थी,पालक मोठया संख्येने उपस्थित होते.