बापूच्या ढाब्यावर वाढली मुजोरी, अधिकाऱ्यांची काय मजबुरी ???
पो.डा. वार्ताहर : भडगांव ते नगरदेवळा स्टेशन दरम्यान बापूचा एक ढाबा असून येणाऱ्या ग्राहकांना अरेरावी करत मनमानी बिले आकारून वसुली करण्यात येत आहे, येथील उद्धट वेटर व मॅनेजर ग्राहकांशी हमरी तुमरी करतात, अरेकारे करून तुमच्याने जे होईन ते करून घ्या, आमचा मालक सर्वकाही पाहून घेईन असा अनुभव सर्वच ग्राहकांना येतांना येत आहे. कोणतेही दारूविक्रीचे परमिट नसल्याने ढाब्या मागे छुपी छोटी जागा तयार करून तेथे अवैध तळीरामांसाठी मदय पिण्याची गुप्त व्यवस्था करून तेथे मदय पिऊन मग ढाब्यात पद्धतशीर गुप गुमान जेवणासाठी बसा अशी डॅशिंग चालबाज सोय करून अधीकाऱ्यांच्या नजरेत दिवसा ढवळ्या धूळफेक करत आहे. आधीकाऱ्यांच्या डोळ्यात सर्रास धूळफेक, तर शासनाचा लाखोंचा महसूल भरणाऱ्या परमिट हॉटेल चालक वाल्यांचे धंदे बुडवले जात आहे, बापूचा पाठीराखा, बाप माणूस कोण आहे जो कामगारांना कामे सोडून हमरी तुमरी करण्याचे एवढं बळ आले. ढाबा मालकाला वेटर व मॅनेजर च्या या घृणास्पद कृतींबाबत माहिती आहे की खरोखर अधिकाऱ्यांना ताब्यात ठेवतोय अन आपला धंदा करतोय! दिवसाढवळ्या अवैध मद्यपुरवठा होत असूनही ठोस कारवाई न करण्यात अधिकाऱ्यांची काय मजबुरी ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे, जिल्हास्तरावरून दाखल घेऊन तात्काळ बंदोबस्त व्हावा अशी मागणी सर्वसामान्य ग्राहकांची आहे.