पो. डा. वार्ताहर ,नांदेड : शासनाच्या सर्व योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात सर्व विभाग एकत्र येऊन काम करत असून रोजगार मेळावे, आरोग्य मेळावे तसेच शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत.
मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्नांची मला जाण आहे. याच भावनेतून ११ महिन्यांपूर्वी आपले सरकार स्थापन झाले तेव्हा सगळे नियम बाजूला ठेऊन एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत केली असल्याचे स्पष्ट केले. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान आपण दिले.
सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती घोषित करावी अशी मागणी होती, परंतू आपल्या सरकारने हा निर्णय घेतला आणि १५०० कोटी रुपयांची तरतूदही केली आहे.
विम्याचे पैसे मिळत नाहीत अशी तक्रार होती. शेतकऱ्यांना विम्याचे पैसे भरावे लागू नये म्हणून केवळ एक रुपयात पिक विमा देण्याचा निर्णय या तुमच्या सरकारने घेतला. आदरणीय प्रधानमंत्री यांची ६ हजार रुपयांची शेतकरी सन्मान योजना होती, राज्य शासनाने आणखी ६ हजार रुपये टाकून ही नमो सन्मान योजना १२ हजार केली.
आजवरच्या मंत्रिमंडळाच्या सर्व बैठकांमध्ये कायम सर्वसामान्य माणसांच्या हिताचे निर्णय घेतले असल्याचे यावेळी निक्षून सांगितले. आज नांदेडमध्ये एकूण १४ लाख ६४ हजार लाभार्थ्यांना २ हजार २१३ कोटी रुपयांचे लाभ मिळवून देण्यात आले असून हा आलेख चढता राहणार असल्याचे सांगितले.
नांदेड शहरातील आमदार बालाजी कल्याणकर यांनी मागणी केलेली ५६७ कोटी रुपयांची कामे मान्य करण्याचे काम या सरकारने केले. पैनगंगा नदीवर सात बंधारे बांधण्यास मंजूरी, १६०० कोटी रुपये खर्च २५ हजार हेक्टर यामुळे जमिन ओलिताखाली येणार आहे.
अडीच वर्षे बंद असलेले सर्व अडथळे दूर करून सर्वसामान्यांसाठी निर्णय घेतले. वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेमार्ग मार्गी लावू तसेच रेल्वे प्रकल्पांना शासनातर्फे संपूर्ण सहकार्य देऊ अशी ग्वाही देतानाच समृद्धी महामार्ग नांदेडपर्यंत आणण्यासाठी, विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. #हिंगोली मध्ये वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने १०० कोटींचा हळद प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. तसेच नांदेडसाठी कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव पाठवा तो तपासून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असेही यावेळी आश्वस्त केले. तसेच जिल्ह्यात पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेले पुनर्वसनाचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, खासदार हेमंत पाटील, खासदार प्रतापराव चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार संतोष बांगर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राजेश पवार, आमदार राम पाटील वातोळीकर, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार तुषार राठोड, आमदार भीमराव केराम, नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, नांदेड मनपा आयुक्त महेश डोईफोडे, नांदेड नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, आयजी शशिकांत महावळकर हेदेखील उपस्थित होते.