पो. डा. सागवन वार्ताहर : सागवन येथे दिनांक २३ जून रोजी मध्यरात्री ३.०० वाजता श्री साहेबराव पुंडलिक सोनुने यांच्या घरी ५ ते ६ अज्ञात चोरट्यांनी जबरदस्त दरोडा टाकला , यामध्ये श्री साहेबराव सोनुने तसेच त्यांच्या पत्नी सौं. द्वारकाबाई सोनुने यांना जबरदस्त मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले होते, या प्रसंगाची माहिती धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या कानावर पडताच त्यांनी ताबडतोब चंदीगड येथून युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांना भ्रमणध्वनीद्वारे फोन करून घटनास्थळी जावयास सांगितले,तसेच धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांनी पोलीस अधीक्षक श्री सुनिल कडासने.साहेब यांच्याशी फोनवर चर्चा करून दरोडेखोरांना लवकरात-लवकर जेरबंद करण्यास सांगितले, युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी देखील क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी भेट देऊन पोलीस प्रशासनास ताबडतोब पाचारण करण्यास सांगितले तसेच आजूबाजूच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांना गजाआड करण्याच्या देखील आ. संजुभाऊ गायकवाड वतीने सूचना दिल्या तसेच आज रोजी सकाळी डॉक्टर श्री राजपूत साहेब यांच्या हॉस्पिटलला भेट देऊन सोनुने दांपत्याची भेट घेतली तसेच डॉक्टरांना सर्वतोपरी उपचार करण्यास सांगितले, यावेळी सोबत सागवन ग्रामपंचायत सदस्य गोपाल भाग्यवंत, प्रवीण वाघलव्हाळे, ज्ञानेश्वर खांडवे यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते…..!