पो.डा. वार्ताहर , लातूर :
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2024-25 अंतर्गत फुलपिक लागवड, मशरुम उत्पादन, हरीतगृह, शेडनेट हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग, 20 एचपी टॅक्टर, शेतकरी अभ्यास दौरा, सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, कांदाचाळ, पॅक हाऊस व प्राथमिक प्रक्रिया केंद्र आदी बाबींचा लाभ देण्यात येणार आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव यांनी केले आहे.
ऑनलाईन अर्ज करताना महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login किंवा https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. तसेच संगणक, लॅपटॉप, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीमधील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येतील. पोर्टलवर अर्ज करण्यासाठी लागणारी सातबारा, आठ अ, बँक पासबुक व आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत असणे आवश्यक आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. जाधव यांनी केले आहे.