पो. डा. वार्ताहर : आज दिनांक २१/०६/२०२३ रोजी मनकासे अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण,सरचिटणीस संतोषभाई धुरी यांच्या सूचनेनुसार बेस्ट उपक्रमातील डागा ग्रुप,मागठाणे आगार येथील बेस्ट वाहन चालक कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारत प्रवेश केला.
यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या द्वार सभेला मनसे सरचिटणीस नयन कदम, विभाग अध्यक्ष विलास मोरे,मनकासे उपाध्यक्ष संदीप राणे , निलेश पाटील,दिनेश चव्हाण,बेस्ट कर्मचारी सेनेचे सरचिटणीस अमित चव्हाण,रुकेश गिरोला,उपविभागध्यक्ष प्रकाश घोसाळकर,संजय पाटील,शाखाध्यक्ष जतिन पवार,नरेंद्र पुरंदेकर,उपसचिव विवेक राऊत,चिटणीस वासुदेव नार्वेकर,शिल्पाताई सावंत,भाग्यश्री इंगळे,विद्या गायकवाड इत्यादी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
लवकरच सर्व कामगारांच्या समस्या व्यवस्थापना पुढे मांडण्यात येतील याची सर्व कामगारांनी नोंद घ्यावी.