पो.डा. वार्ताहर, वाशिम : २२ डिसेंबर २०२३ च्या आदेशान्वये २०२४ करीता जाहिर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्टीच्या आदेशामध्ये अंशत: बदल करून जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. आज ९ मे रोजी जारी केलेल्या सुधारित आदेशानुसार सन २०२४ या वर्षासाठी संपुर्ण वाशिम जिल्ह्याकरिता तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर
केल्या आहेत. १० मे रोजी अक्षय तृतीया ,२ सप्टेंबर रोजी पोळा,११ सप्टेंबर रोजी ज्येष्ठागौरी पुजन सणानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात स्थानिक सुटी राहणार आहे.
हा आदेश वाशिम जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि अधिकोष यांना लागु नसल्याचे आदेशात नमूद केले आहे.