पो.डा. वार्ताहर, नागपूर : मुलांच्या सूप्त गुणांना वाव मिळण्यासाठी तसेच मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास व्हावा या दृष्टिकोनातून 7 मे ते 7 जून या कालावधीत शासकीय मुलांचे बालगृह पाटणकर चौक येथे करण्यात आले आहे.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी महिला बालविकास विभागीय उपायुक्त अपर्णा कोल्हे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी भारती मानकर, बालकल्याण समितीचे विनायक नंदेश्वर, विजया शहा, बालन्याय मंडळ सदस्य वैशाली पांढरे, संस्थाध्यक्ष बापूसाहेब चिंचाने, सुरेखा बोरकुटे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, इसाप संस्थेचे संजय कुमार होत्ता यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन केलेले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संरक्षण अधिकारी साधना हटवार यांनी केले.