कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 71.59 टक्के तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 71.11 टक्के मतदान
पो.डा. वार्ताहर, कोल्हापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात 7 मे रोजी उत्साहाने मतदान झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात 71.98 टक्के मतदान झाले. यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे 71.59 टक्के तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 71.11 टक्के मतदानाची नोंद झाली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याबरोबरच प्रशासनाच्या आवाहनाला दाद देत कोल्हापूर जिल्हावासियांनी मतदानही उत्साहाने केले. यामुळे उन्हाळा असतानाही 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या 70.88 या टक्केवारीत 2024 च्या लोकसभा निवडणूकीत 1.10 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.
मंगळवार दिनांक 7 मे 2024 रोजी जिल्ह्यात 47 कोल्हापूर व 48 हातकणंगले या दोन मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. मतदानानंतर सायंकाळी कोल्हापूर मतदारसंघाच्या सर्व मतपेट्या सुरक्षितपणे रमणमळा स्ट्राँगरुममध्ये तर 48 हातकणंगले मतदारसंघाच्या सर्व मतपेट्या सुरक्षितपणे राजाराम तलाव येथील स्ट्राँगरुममध्ये पोहोचविण्यात आल्या असून स्ट्राँगरुमबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील 6 विधानसभा मतदार संघातील आकडेवारी खालीलप्रमाणे-
271 चंदगड पुरुष 159772, महिला 158142 व इतर 8 असे एकूण 317922 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 110495, महिला 107001 व इतर 3 असे एकूण 217499 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष 69.16 टक्के, महिला 67.66 टक्के व इतर 37.50 टक्के अशा एकूण 68.41 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
272 राधानगरी पुरुष 172998, महिला 160985 व इतर 14 असे एकूण 333997 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 123113, महिला 109898 व इतर 7 असे एकूण 233018 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष 71.16 टक्के, महिला 68.27 टक्के व इतर 50 टक्के असे एकूण 69.77 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
273 कागल पुरुष 165670, महिला 163829 व इतर 5 असे एकूण 329504 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 127377, महिला 120758 व इतर 3 असे एकूण 248138 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 76.89 टक्के, महिला 73.71 टक्के व इतर 60 टक्के असे एकूण 75.31 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
274 कोल्हापूर दक्षिण पुरुष 177749, महिला 171410 व इतर 47 असे एकूण 349206 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 129522, महिला 117665 व इतर 17 असे एकूण 247204 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 72.87 टक्के, महिला 68.65 टक्के व इतर 36.17 टक्के असे एकूण 70.79 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
275 करवीर पुरुष 163158, महिला 149759 व इतर 0 असे एकूण 312917 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 134437, महिला 114672 व इतर 0 असे एकूण 249109 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 82.40 टक्के, महिला 76.57 टक्के व इतर 0 टक्के असे एकूण 79.61 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
276 कोल्हापूर उत्तर पुरुष 145387, महिला 147453 व इतर 17 असे एकूण 292857 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 99790, महिला 91463 व इतर 9 असे एकूण 191262 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 68.64 टक्के, महिला 62.03 टक्के व इतर 52.94 टक्के असे एकूण 65.31 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील 6 विधानसभा मतदार संघातील आकडेवारी खालीलप्रमाणे-
277 शाहूवाडी पुरुष 152738, महिला 142597 व इतर 5 असे एकूण 295340 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 111736, महिला 103629 व इतर 3 असे एकूण 215368 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 73.2 टक्के, महिला 72.7 टक्के व इतर 60 टक्के असे एकूण 72.92 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
278 हातकणंगले पुरुष 169655, महिला 162008 व इतर 18 असे एकूण 331681 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 133523, महिला 116288 व इतर 9 असे एकूण 249820 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 78.7 टक्के, महिला 71.8 टक्के व इतर 50 टक्के असे एकूण 75.32 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
279 इचलकरंजी पुरुष 154227, महिला 146833 व इतर 60 असे एकूण 301120 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 108648, महिला 96533 व इतर 9 असे एकूण 205190 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 70.4 टक्के, महिला 65.7 टक्के व इतर 15 टक्के असे एकूण 68.14 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
280 शिरोळ दक्षिण पुरुष 158858, महिला 158628 व इतर 4 असे एकूण 317490 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 122122, महिला 111537 व इतर 3 असे एकूण 233662 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 76.9 टक्के, महिला 70.3 टक्के व इतर 75 टक्के असे एकूण 73.60 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
283 इस्लामपूर पुरुष 137945, महिला 133475 व इतर 5 असे एकूण 271425 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 98876, महिला 86847 व इतर 4 असे एकूण 185727 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 71.7 टक्के, महिला 65.1 टक्के व इतर 80 टक्के असे एकूण 68.43 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
284 शिराळा पुरुष 152428, महिला 144790 व इतर 3 असे एकूण 297221 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 103685, महिला 96619 व इतर 2 असे एकूण 200306 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 68 टक्के, महिला 66.7 टक्के व इतर 66.7 टक्के असे एकूण 67.39 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.